छत्रपती संभाजीनगर

Chhatrapati Sambhajinagar : महापौर पदावरून भाजप-शिंदेसेना वादात, महायुतीच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह

महापौर पदाच्या दाव्यावरून भाजप-शिंदेसेना तणावात, महायुतीच्या भवितव्याबाबत चिंता

Published by : Shamal Sawant

छत्रपती संभाजीनगर आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील भाजप आणि शिंदेसेना यांच्यात वादाचे सूर चढताना दिसत आहेत. भाजप खासदार डॉ. भागवत कराड यांनी महापौर पद भाजपचाच असावा, असा दावा केल्यानंतर शिंदेसेना नेत्यांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या असून युतीत तणाव निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

भाजपचे नव नियुक्त शहराध्यक्ष किशोर शितोळे आणि माजी अध्यक्ष शिरीष बोराळकर यांनी निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवून शिवसेनेच्या खासदार-आमदारांचा विजय केवळ भाजपच्या बळावरच शक्य झाला, असे वक्तव्य करून शिंदेसेनेच्या नेतृत्वाला अप्रत्यक्षपणे डिवचले. त्यावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री संजय शिरसाट यांनी, “भाजपने युती तोडली तर पश्चात्ताप करावा लागेल. 1988 मधील स्थिती पुन्हा ओढवू शकते,” असा थेट इशारा दिला.

त्याचबरोबर आमदार प्रदीप जैस्वाल यांनीही, “अधिक घमेंड दाखवू नये. युतीचा आधार असला तरी शिवसेनेने स्वबळावर 26 जागा 1988 मध्ये जिंकल्या होत्या. इतिहास लक्षात ठेवावा,” असा टोला लगावत भाजपच्या आक्रमक धोरणावर टीका केली. दरम्यान, भाजप खासदार डॉ. भागवत कराड यांनी पत्रकार परिषदेत छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका निवडणूक महायुती की स्वाबळावर लढायची याचा अद्याप निर्णय झाला नसून,महापौर भाजपचा असावा यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असल्याचे जाहीर केले. यामुळे महापौरपदाच्या दाव्यावरून दोन्ही पक्षांत तणाव वाढण्याची शक्यता आहे.

शहरात युती टिकून राहील का, की दोन्ही पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक लढतील याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. महापालिका निवडणूक जवळ आली असताना, अशा शाब्दिक झटापटींमुळे स्थानिक राजकारण अधिकच तापू लागले आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा